ओळखीचे सत्र


स्पर्धा-परीक्षा-व-चालु-घडामोडी (आपल्या औरंगाबाद मध्ये...)

            पहिल्याच दिवशी वर्गामध्ये सरांचे आगमन झाले.ओळखीचे सत्र सुरु करण्यात आले.तुमचे नाव काय.....?तुमचे गाव काय....?असे प्रश्न विचारण्यात आले....कुणाचे बाबा वकील, डॉक्टर तर कुणाचेइंजिनीअर.....माझा नंबर येताच...मी पटकन उभा राहिलो व चटकनसांगितले“सर, माझे बाबा शेतकरी आहेत.”मी असं म्हणताच सगळा वर्गहसायला लागला.....मला याचा फार राग आला.....मी म्हटले “सर मी नाही म्हणत,या साऱ्यांचा धंदा छोटा हाय,पण,....या काळ्या आईची शपथसर...या साऱ्याहूनमाझा बाप मोठा हाय....हाडाची काडं करून रात दिन राबतअसतो,तो राबतो म्हणून तुम्ही आम्ही दिसतो...काड्याकुड्याचं जिनं त्याचंपण,साऱ्या जगाला भाकर देतो..अन् साऱ्या जगाला भाकर देणारा,कधी कधी उपाशीच झोपतोमाहित नसताना पाऊस येईल-नाही येईल,हजारो रुपये मातीत गाळतो,खरंच सर तो मातीसंग जुगारच खेळत असतो.सगळे जण जगण्यासाठी जुगार खेळतातपण,माझा बाप जगवण्यासाठी जुगार खेळतो.अन्,या जगण्याच्या जुगारीमध्ये तो नेहमीचहरतो.माणुसकीच्या गावामध्ये अजूनत्याची वस्ती हाय,खरंच सर माझ्या बापाची मरणा संगदोस्ती हाय....फाटके तुटके कपडे सरतो अजूनही अंगावर घालतो....,पण,सर मला तुमच्या कपडयाचाहीत्याचाच घामाचा वास येतो.टाकून पहा मातीत सर तुम्हीपाच-पन्नास हजार, तेव्हाच तुम्हाला कळेल,त्याच्या जगण्याचा जुगार.म्हणून,म्हणतो सर अभिमान हाय मलामाझा बाप शेतकरी असल्याचाअभिमान आहे मलामी या शेतकऱ्याचा वारस असल्याचाजग लिहिते आईसाठी,जग लिहिते साऱ्यांसाठी पण,मी लिहितो बापासाठी, त्याच्याचजीवनाचा जुगार........”दारूचा स्टाॅक संपत नाहीतंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाहीऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉककधी संपत नाही.तर मग ऐण पेरणीच्या दिवसात खता-बियांण्याचास्टॉक कसा काय संपतो......?आणी वाढीव पैसे देताच लगेच कसा काय उपलब्धहोतो.....दलाल व्यापार्यांनो पुरे करा हा हरामखोरपणा......बस करा आता शेतकर्यांना लुबाडुन खाणं. ....कारण,ज्या दिवशी आम्हा शेतकर्यांचा अन्नधान्याचास्टाँक संपेल नातेव्हा तुम्हाला भिक पण मिळणार नाही.सर्वानसाठी पोस्ट केला पन जगाचा पोशिंदा शेतकऱ्यासाठी एक पोस्टमनापासून पटल तर शेयर करा.कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,रात्रभर झोप नाही येणार.विचार करा शेतकऱ्याच कस होत असेल !!

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post