No title




                              मित्रानो आज राज्यसेवा परीक्षेची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्धकरण्यात आली..या जाहिरात मधील एकूण भरवयच्या पदाची स्थिती पाहून काहीजण निराश झाले.काही जणांनी तर अभ्यास पण बंद केला.काही जणांनी पूर्ण दिवस या जाहीरातीबद्दल बद्दल चर्चा करण्यात दिवस घालवला. निराशेच कारण दोन सांगता येतील एक म्हणजे पदाची संख्या ही खूपच कमी आहे.आणि दूसरे म्हणजे जी महत्वपूर्ण पदे आहेत त्यांची अपेक्षेप्रमाणे संख्या कमी असणे.
* काही विद्यार्थी या परीक्षेला प्रथम सामोरे जात आहेत त्यांच्यामध्ये ही भावना जास्त असणार आणि हे साहजिक पण आहे.त्यामुळे त्यांना भीती पण वाटते की आपण ही परीक्षा देण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का ?
                                    मागील स्पर्धा परीक्षातील अनुभव सांगतो की पुर्व परीक्षाचे निकालानंतर येणाऱ्या advertisement मध्ये एकूण पदांची स्थिति बदलते.पदाची संख्या वाढते.आणि काही नवीन पदे पण advertise मधे वाढतात.त्यामुळे निराश न होता अभ्यास करने जास्त महत्वाचे.


                               आणखी एक भीती असेल की,जर आताच्या advertise मधे एवढी पदे कमी आहेत तर मुख्य परीक्षेत या पदांच्या संख्येचा 12-13 पटच उमेदवार पात्र ठरतील.तर मित्रानो तसे नसते पुर्व परिक्षेच रिज़ल्ट हा नंतर येणाऱ्या advertise मधील पदांच्या संख्येच्या पटीत घेतात.त्यामुळे पुर्व परीक्षा उत्तीर्ण होईल की नाही ही भीती काढून टाका.


 * Plz खालील प्रश्न टाळा आणि स्टडी करा

1) जागा वाढतील का?
2) माझे कसे होयील ?
3)एवढ्या प्रचंड स्पर्धेत माझा टिकाव लागेल का?
4)स्पर्धा परीक्षा देण्याचा माझा निर्णय चुकला तर नाही ना ?
5)एवढ्या कमी जागेत माझा निभाव लागेल का ?
6)पुण्यामधे खूप मुलेमुली अभ्यास करतात.कॉंपिटेशन खूप आहे.मी तर एका छोट्याशा      

        शहरात,गावामध्येया परिक्षेच्या तयारी करतो/करते मला जमेल का?
7)सर्वात महत्वाचे- advertise कधी येणार ? जागा किती असतील?
    क्लास 1 किती असतील?  परत जागा वाढतील का ?आयोगाला काही कळते कि नाही?
 

                   स्पर्धा परिक्षेत काही विद्यार्थी अभ्यास न करता इतर गोष्टीकडे लक्ष जास्त देतात ,जसे की advertise कधी येणार ,पदाची संख्या किती असेल,त्यामधे DC, DySP, class -1 जागा किती आसतील, पुर्व परीक्षेनंतर जागा वाढतील का ? आसे विचार करणारे विद्यार्थी परीक्षेच्या वेगवेगळ्या टप्यावरगारद होतात. तुम्ही ठरवा कि अशा विद्यार्थ्यांच्या गटात तुम्हाला सामील व्हायचे कि,स्वतःवर विश्वास ठेवून फालतू गोष्टीकडे दुर्लक्ष करून यशस्वी व्हायचे.
 

                                            ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टीवर वायफळ चर्चा करून वेळ वाया घालवु नका. 100 टक्के प्रयत्न करून अभ्यास करने आपल्या हातात आहे.आणि आपल्याला एकच पोस्ट मिळवायच आहे.जरी परिक्षेत एकच पदाची निवड करायची असेल तर ते पद मी मिळवणार् या आत्मविश्वासाने सामोरे जावा.नेहमी सकारात्मक विचार करा.सातत्यपूर्णप्रयत्न करून स्वतःला स्पर्धेला तयार करा.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post