१४ एप्रिल इ.स.१८९१ -महू गावी जन्म. इ.स.१८९६ -आई, भिमाईचे निधन नोव्हेंबर इ.स.१९०० सातार्याच्या शासकीय शाळेत प्रवेश. इ.स.१९०४ -एलफिन्स्टन शाळेत प्रवेश. इ.स. १९०६ -रमाई यांचेशी विवाह इ.स.१९०७ -मॅट्रिक परीक्षा, ७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली. इ.स.१९०८ जानेवारी -एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश. इ.स.१९१२ -मुलगा यशवंत भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला. इ.स. १९१३ -बी.ए.ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. ( पर्शियन आणि इंग्रजी हे विषय) जून इ.स.१९१५ -एम.ए.ची परीक्षा पास झाले. जून इ.स.१९१६ -कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी.साठी काम पूर्ण करून लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले. इ.स.१९१७ -कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली. जून इ.स.१९१७ -लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती. इ.स.१९१८ -साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष नोव्हेंबर इ.स.१९१८ -सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ). जून ३१ इ.स.१९२० -साप्ताहिक मूकनायक सुरू केले मार्च २१ इ.स.१९२० -कोल्हापूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षपदी असलेल्या अस्पृश्य परिषदेत भाषण जून इ.स.१९२१ -लंडन विद्यापीठाने त्यांना एम.एस्सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली. मार्च इ.स.१९२३ -रुपयाची समस्या हा प्रबंध व डी.एस्सी.(अर्थशास्त्र) ही पदवी २० जुलै इ.स.१९२४ -बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, घोषवाक्य – शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. २० मार्च इ.स.१९२७ -चवदार तळे सत्यागृह एप्रिल ३ इ.स.१९२७ -बहिष्कृत भारत नावाचे वृतपत्र सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली सप्टेबर इ.स.१९२७ -समाज समता संघ स्थापन केला. इ.स.१९३४ -परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती. मे २६ इ.स.१९३५ -रमाई भीमराव आंबेडकर यांचे निधन ऑक्टोबर १३ इ.स.१९३५ -येवला, येथे धर्मांतराची घोषणा ऑगस्ट इ.स.१९३६ -स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डिसेंबर इ.स.१९४० -थॉट्स ओन पाकिस्तान हे पुस्तक प्रसिद्ध जुलै इ.स.१९५१ -भारतीय बुद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना मे इ.स.१९५३ -मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना डिसेंबर २५ इ.स.१९५५-देहूरोड पुणे येथे बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना डिसेंबर 6 , इ.स.1956 -महापरिनिर्वाण
औरंगाबाद अभ्यास केंद्र मध्ये आपले स्वागत आहे.आपल्या ध्याच्या गती मध्ये आमचे सहकार्य आणि एक मदतीचा हात म्हणून आम्ही वर्ष २०१३-१४ पासून कार्यरत आहोत. २०१९ वर्षाचे नवीन उपक्रम लवकरच ...
0 Comments