No title

भूगोल बद्दल माहिती - स्पर्धा परीक्षा
 


* भूगोल शब्दाचा जनक - इरेस्टोथेनिस सूर्य
* सूर्याची निर्मिती ४६० कोटी वर्षापूर्वी झालेली आहे.
* पृथ्वीची निर्मिती ४५० कोटी वर्षापूर्वी झालेली आहे.
* पृथ्वी ते सूर्य अंतर - १४९ दशलक्ष किमी (१४ कोटी ९० लाख किमी)
- अपसूर्य स्थितीत अंतर - १५ कोटी २० लाख किमी
- उपसूर्य स्थितीत अंतर - १४ कोटी ७० लाख किमी
* पृथ्वीवर सूर्याची किरणे येण्यास ८.२ मिनटे लागतात.
* सूर्याचा व्यास - १३ लाख ९२ हजार किमी
* सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान - ५७६०°C
* सूर्याचे अंतर्गत भागातील तापमान - १.५ कोटी ते २ कोटी °C
* सूर्याचा प्रथम अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम भारताने २००८ मध्ये आदित्य यान पाठवले होते.
* सूर्यकुलाच्या एकूण वस्तुमानापैकी ९९% वस्तुमान सूर्याचे आहे.
* केंद्रीय साम्मिलानातून सूर्यात उर्जा निर्माण होते.
* ११ वर्ष सौरडागाचे चक्र असते. त्याचे तापमान १५००°C
* सूर्यातील रासायनिक भागात ७१% हायड्रोजन असते, २६.५% हेलियम, तसेच अन्य घटक २.५% असतात.




ग्रह 

* २० ऑगस्ट २००६ रोजी प्राग, झेक प्रजासत्ताक येथे भरलेल्या ५७ व्या खगोल परिषदेत प्लुटोचे ग्रहपद काढून घेण्यात आले. त्याला आता १३४३४० हा क्रमांक दिला गेला आहे.
* ग्रहांचा क्रम:- १.बुध २.शुक्र ३.पृथ्वी ४.मंगळ ५.गुरु ६.शनि ७.युरेनस ८.नेपच्यून
* मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये लघु ग्रहाचा पट्टा आहे.
* लघुग्रहाच्या पट्ट्यापासून अलीकडे असणारे ग्रह हे अंतर्ग्रह आहेत. अंतर्ग्रह कठीण स्वरूपाचे आवरण असते. उदा. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ.
* लघुग्रहाच्या पट्ट्यापासून पलीकडे असणाऱ्या ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. बहिर्ग्रह वायुरूप अवस्थेत आहेत. उदा. गुरु, शनि, युरेनस, नेपच्यून.
* पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे
* सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे.
* शुक्र ग्रहाला पृथ्वीची बहिण व सांजतारा असेही म्हणतात.
* परीभ्रमणासाठी सर्वात जास्त वेळ घेणारा ग्रह नेपच्यून आहे. (१६४ वर्ष)
* परीभ्रमनासाठी सर्वात कमी वेळ घेणारा ग्रह बुध आहे. (८८ दिवस)
* परीवलना साठी सर्वात कमी वेळ घेणारा ग्रह गुरु आहे. (९.९ तास)
* परिवलनासाठी सर्वात जास्त वेळ घेणारा ग्रह शुक्र आहे. (२४३ दिवस)
* पृथ्वीचे परिभ्रमण - ३६५ दिवस ५ तास ४८ मिनटे ४६ सेकंद.
* पृथ्वीचे परिवलन - २३ तास ५६ मिनटे ४ सेकंद.
* शुक्र ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
* पृथ्वीला एक उपग्रह आहे.
* मंगळाला दोन उपग्रह आहेत.
* सर्वात जास्त उपग्रह गुरूला आहेत. (सुमारे ६१)
* सर्वात कमी बुध व शुक्र या ग्रहांना एकही उपग्रह नाही.
* नेपच्यूनच्या पलीकडील सर्व ग्रहांना बटुग्रह म्हणतात.
* १८००० ते ४०००० किमी/से या वेगाने ग्रह प्रसरण पावत आहेत. - हबलचा सिद्धांत
धुमकेतू & उल्का
* हॅलेचा धूमकेतूचा शोध - १९१०
* दर ७६ वर्षांनी हॅलेचा धुमकेतू दिसतो. यापूर्वी १९८६ साली दिसला होता.
* अशनी म्हणजे जमिनीवर पडलेली उल्का होय.
* बुलडाणा येथील लोणार सरोवर उल्कापातामुळे बनलेले आहे.
तारकामंडळ
* तारकामंडळ म्हणजे दीर्घिका होय. म्हणजे Galaxy.
* एका दिर्घिकेत १० हजार कोटी ते २० हजार कोटी तारे असतात.
* विश्वात एकूण २० लाख कोटी दीर्घिका आहेत.
* ध्रुवतारा ३०० प्रकाशवर्ष दूर आहे.
* दीर्घिकेची लांबी - १ लाख प्रकाश वर्ष
* आपल्या जवळची दीर्घिका M31 आहे.
* तिला Andrimul Nebula असे नाव दिले आहे.
* बिग बँग थेअरी चा प्रयोग २००९ मध्ये फ्रांस व स्वित्झर्लंड च्या सीमेवर करण्यात आला.




(लाईक नका शेअर करा)

ग्रुप मधे सामील व्हा
औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)
https://www.facebook.com/groups/732455023500649/?ref=bookmarks
And
स्पर्धा-परीक्षा--चालु-घडामोडी (आपल्या औरंगाबाद मध्ये...)
https://www.facebook.com/groups/mpsc01/files/

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post